राज्यसेवा मुख्य परिक्षा अभ्यासक्रम

राज्यसेवा मुख्य परिक्षा अभ्यासक्रम

• सामान्य अध्ययन –एक

इतिहास व भूगोल

दर्जा:पदवीएकूण गुण:१५०

प्रश्नपत्रिकेचे स्वरूप:वस्तुनिष्ठकालावधी:२ तास

टीप:
(1)प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे स्वरूप
आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की,एखादी सुशिक्षित
व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ
शकेल,विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य
ज्ञानाची चाचणी घेणे हा त्याचा उद्देश आहे.
(२)उमेदवारांनी खाली नमूद केलेल्या विषयातील / उपविषयातील
अद्दयावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे.
---------------------------------------

१.इतिहास:

१.१ आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास
(१८१८-१८५७):आधुनिक शिक्षणाची ओळख - वृत्तपत्रे,रेल्
वे,टपाल व तार,उद्दयोगधंदे,जमीन सुधारणा व सामाजिक -
धार्मिक सुधारणा - यांचा समाजावरील परिणाम.

१.२ ब्रिटीश सत्तेची भारतामध्ये स्थापना:प्रमुख भारतीय
सत्तांच्या विरूध्द युध्दे,तैनाती फौज
धोरण,खालसा धोरण,१८५७पर्यंतचीब्रिटीश राज्याची रचना.

१.३ सामाजिक - सांस्कृतिक बदल:ख्रिश्चन मिशनबरोबरचे
संबंध,इंग्रजी शिक्षण व मुद्रणालयाचे आगमन,अधिकृत सामाजिक
सुधारणांचे उपाय(१८२८ ते १८५७),सामाजिक - धार्मिक
सुधारणांच्या चळवळीः ब्राम्हो समाज,प्रार्थना समाज,सत्यशोध
समाज,आर्य समाज,शीख तसेच मुस्लिम धर्मियांतील
सुधारणा चळवळी,डिप्रेस्ड क्लासेस मिशन,ब्राम्हणेतर चळवळ व
जस्टीस पार्टी.

१.४ सामाजिक व आर्थिक जागृती:भारतीय राष्ट्रवाद - १८५७
चा उठावआणि त्यानंतर,इंडियन नॅशनल कॉंग्रेस(१८८५ - १९४७)
आझाद हिंद सेना,महत्वाच्या व्यक्तींची भूमिका,स्वातंत्र्यपूर्व
भारतातील सामाजिक जागृतीमधील वृत्तपत्रे व शिक्षण
यांची भूमिका.

१.५ भारतीय राष्ट्रवादाची निर्मिती व विकास:सामाजिक
पार्श्वभूमी,राष्ट्रीय संघटनांची स्थापना,शेतकऱ्यांचे उठाव,इंडियन
नॅशनल कॉंग्रेसची स्थापना,मवाळ गटाची वाढ,जहाल
गटाची वाढ,मोर्ले-मिंटो सुधारणा,स्वराज्
याची चळवळ,लखनौ करार,मॉंट-फोर्ड सुधारणा.

१.६ गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ:गांधीजींचे नेतृत्व
आणि प्रतिकाराचे तत्व,गांधीजींच्या लोक चळवळी,असहकार,सव
िनय कायदेभंग,वैयक्तिक सत्याग्रह,चलेजाव चळवळ,सत्यशोधक
समाज,गांधीजी आणि अस्पृश्यता निर्मूलन,डॉ.बाबासाहेब
आंबेडकरांचा अस्पृश्यांच्या समस्येबाबतचा दृष्टीकोन,मुस्लिम
राजकारण आणि स्वातंत्र्य चळवळ(सर सय्यद अहमद खान व
अलिगढ चळवळ,मुस्लिम लीग व अली बंधू,इक्बाल,जिना),संयुक्त
पक्ष(युनियनिस्ट पार्टी)कृषक प्रजा पार्टी,हिंदू महासभेचे
राजकारण,साम्यवादी नेते आणि भारतीय स्वातंत्र्य
चळवळ,कॉंग्रेस समाजवादी पार्टी,राष्ट्रीय चळवळीतील
महिला सहभाग,संस्थानातील जनतेची चळवळ,साम्यवादी(डावी)
चळवळ - शेतमजुरांची चळवळ - आदिवासींचे बंड,ट्रेड युनियन
चळवळ व आदिवासी चळवळ

१.७ स्वातंत्र्योत्तर भारत:फाळणीचे परिणाम,संस्थानांचे
विलीनीकरण,भाषावार प्रांतरचना,नेहरूंचे अलिप्ततेचे
धोरण,संयुक्त महाराष्ट्र चळवळ,त्यात सहभागी झालेले महत्वाचे
राजकीय पक्ष व व्यक्ती,शेजारील राष्ट्रांशी संबंध,आंतरराष्ट्रीय
राजकारणामधील भारताची भूमिका,कृषी,उद्दोगधंदे,शिक्षण,
विज्ञान व तंत्रज्ञान यांमधील
प्रगती,इंदिरा गांधींच्या नेतृत्वाचा उदय,बांगला देशाची मुक्ती,इंदि
अलिप्तवाद,राज्यातील आघडीची सरकारे,विद्दयार्थ्यामधील
असंतोष,जयप्रकाश नारायण आणि आणीबाणी,पंजाब व
आसाममधील दहशतवाद,नक्षलवाद व माओवाद,पर्यावरण
चळवळ,महिला चळवळ व वांशिक चळवळ

१.८ महाराष्ट्रतील निवडकसमाजसुधारक-
त्यांची विचारप्रणाली व कार्य:गोपाळ गणेश
आगरकर,महात्मा फुले,मा.गो.रानडे,प्रबोधनकार
ठाकरे,महर्षि कर्वे,राजर्षि शाहू महाराज,महर्षि विठ्ठल
शिंदे,बाबासाहेब आंबेडकर,लाकमान्य
टिळक,महात्मा गांधी,विनोबा भावे,विनायक दा.सावरकर,अण्णा
भाऊ साठे,क्रांतीवीर नाना पाटील,लहुजी साळवे,कर्मवीर भाऊराव
पाटील.

१.९ महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा(प्राचीन ते आधुनिक)
:प्रायोगिक कला(नृत्य,नाटक,चित्रपट,संगीत व
लोककला,लावणी,तमाशा,पोवाडा,भारूड व इतर लोकनृत्य),दृश्य
कला(वास्तु रचना,चित्रकला व वास्तुशिल्प)आणि
उत्सव,महाराष्ट्राच्या सामाजिक व मानसिक विकासावरील
वाड्.मयाचा प्रभावः,भक्ती वाड.मय,नागरी व ग्रामीण वाड्.मय.

२.भूगोल - महाराष्ट्रच्याविशेष संदर्भासह

२.१ प्राकृतिक भूगोल:पृथ्वीचे अंतरंग- रचना व प्राकृतिक जडण
घडण.भूरूप विकास नियंत्रित करणारे घटक,भूरूपिक
चक्रांची संकल्पना -नदीसंबंधी,शुष्क,हिम,समुद्रतटीय चक्र
यांच्याशी संबंधित भूरूप,भारतीय उपखंडाची उत्क्रांती व
भूरूपवर्णन,महत्वाचे भूरूपकीय प्रदेश - पूरांची समस्या -
महाराष्ट्राचा भूरूपकीय तपशील.महाराष्ट्राची भूरूपिक
वैशिष्टे,भारताचे त्यांच्या शेजारील राष्ट्राच्या,हिेद
महासागराच्या,आशियाच्या व जगाच्या संदर्भातील मोक्याचे
ठिकाण.

२.२ महराष्ट्राचा आर्थिकभूगोल:खनिजे व
ऊर्जा साधनसंपत्ती:महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे
वितरण्,महत्व व विकास,महाराष्ट्रातील पर्यटन - धार्मिक
पर्यटन,वैद्दयकीय पर्यटन,पर्यावरणाभिमूख(इको)पर्यटन व
सांस्कृतिक वारसा,महाराष्ट्रतील संरक्षित वने,अभयारण्ये,र
ाष्ट्रीय उद्दयाने व किल्ले,व्याघ्र प्रकल्प.

२.३ महाराष्ट्राचा मानवी व सामाजिक भूगोल:जनतेचे स्थलांतर -
कारणे व परिणाम,ऊसतोडणी कामगार साधनसंपत्ती व
ज्या प्रदेशात स्थलांतर होते त्या प्रदेशावरील
स्थलांतराचा परिणाम,महाराष्ट्रातील ग्रामीण वस्त्या,शहरी व
ग्रामीण वस्त्यांमधील समस्या - पर्यावरण,गृहनिर
्माण,झोपडपट्टी,पाणीपुरवठा व स्वच्छता,शहरी वाहतूक व
प्रदुषण.

२.४ पर्यावरणीय भूगोल:परिस्थितिविज्ञान व पारिस्थितिक
व्यवस्था -ऊर्जा प्रवाह,वस्तु चक्र,अन्न श्रुंखला व
वेब्ज,पर्यावरणीय अवनती व संवर्धन,जागतिक पारिस्थितिक
असमतोल - प्रदूषण व हरितगृह परिणामातील कार्बन डाय
ऑक्साईडची व मिथेनची भूमिका,जागतिक तापमानतील
वाढ,जैवविविधतेतील घट आणि वनांचा ऱ्हास,पर्यावरण
संरक्षणाबाबत कायदे व पर्यावरणीय प्रभावाचे
परीक्षण,क्योटो प्रोटोकॉल व कार्बन
क्रेडिटस,शहरी कचरा व्यवस्थापन,सागरी संरक्षित क्षेत्र एक व
सागरी संरक्षित क्षेत्र दोन

२.५ जन,भूगोलशास्त्र(महाराष्ट्राच्या संदर्भात):स्थला
ंतराची कारणे व परिणाम,ग्रामीण वशहरी वसाहती -
ठिकाण,परिस्थिती,प्रकार,आकारमान,मोकळया जागा व
भूरूपिकीय स्वरूप,शहरीकरण - पक्रिया व समस्या,ग्रामीण -
शहरी किनार,शहरी प्रभावाचे क्षेत्र,प्रादेशिक असमतोल

२.६ सुदूर संवेदना:सुदूर संवेदनाची संकल्पना,भारतीय सुदूर
संवेदना उपग्रह कल्पनाचित्र,भारतीय सुदूर संवेदना उपग्रह
निर्मिती,एमएसएस बॅन्ड - निळा,हिरवा,लाल व लालसर
रंगाच्या जवळचा,आभासी रंग मिश्रक(फास्ट कलर कॉम्पझिट
(एफसीसी)).नैसर्गिक साधन संपत्तीसह सुदूर संवेदनेचा वापर
करणे.भौगोलिक माहिती यंत्रणा(जीआयएस)व जागतिक
स्थाननिश्चिती यंत्रणा(जीपीएस)सुरू करणे.

३.भूगोल व कृषि

३.१ कृषि परिस्थितीकी:कृषि पारिस्थितीकी व
त्याचा मानवाशी,नैसर्गिक साधनसंपत्तीशी संबंध,त्याचे
कायमस्वरूपी व्यवस्थापन व संवर्धन,पीक वितरण व उत्पादनाचे
घटक म्हणून प्राकृतिक व सामाजिक पर्यावरण,पीक वाढीचे घटक
म्हणून हवामान घटक,पर्यावरणीय प्रदूषण व पीके,प्राणी व
मानव यांच्या संबंधातील धोके.

३.२ हवामान:वातावरण - रचनाव संरचना,सौर उत्सर्जन व
उष्मा समतोल,हवामानाचे घटक - तापमान,वायुदाब,ग्रहीय व
स्थानिक वारे,मान्सून,वायुराशी आणि पुरोभाग व
चक्रीवादळे,भारतीय मान्सूनचे तंत्र,पावसाचे पुर्वानुमान,पर्
जन्यवृष्टी,चक्रीवादळे,अवर्षण व पूर व हवामान प्रदेश,महाराष्ट
्रातील पर्जन्यवृष्टीचे वितरण -अभिक्षेत्रीय व कालिक व
परिवर्तनशीलता -महाराष्ट्राचे कृषि हवामान क्षेत्रे-अवर्षण व
टंचाईची समस्या,अवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम-कृषि,
उद्दयोग व घरगुती क्षेत्रातील पाण्याची आवश्यकता,पिण्या
च्या पाण्याची समस्या,महाराष्ट्राच्याविविध कृषि हवामान
क्षेत्रातील पीक प्ररूप,पीक लागवडीच्या पध्दतीतील बदलांवर
उच्च उत्पन्नाच्या व कमी वेळेतल्या विविध
प्रकारच्या पिकांचा प्रभाव,बहुविध पीक लागवडीची संकल्पना व
आंतरपीक लागवड व त्याचे महत्व,सेंद्रीय शेतीची आधुनिक
संकल्पना,वर्धनक्षम कृषि.

३.३ मृदा:मृदा - प्राकृतिक,रासायनिक व जैविक
गुणधर्म,मृदा तयार होण्याची प्रक्रिया व घटक,खनिजे
आणि मातीचे सेंद्रीय घटक आणि मातीची उत्पादकता कायम
ठेवण्यामधील त्यांची भूमिका,मातीतील आवश्यक असेवृक्ष
लागवडीसाठीचे पोषक घटक आणि इतर लाभदायक घटक
आणि समस्याग्रस्त जमिनी व
त्या लागवडी करण्याच्या पध्दती,महाराष्ट्रातील मृदा अपक्षरण
व जमीन ओसाड होण्याच्या समस्या,जल विभाजकाच्या आधारे
मृद संधारणाचे नियोजन करणे,डोंगराळ,डोंगराच्या पायथ्यावरील
व दरीतील जमिनीची धूप व पृष्ठवाह व्यवस्थापन,त्या
ंच्यावरपरिणाम करणाऱ्या कार्यपध्दती व घटक.

३.४ जल व्यवस्थापन:सद्दय परिस्थिती,जल
संधारणाच्या पध्दती व महत्व,पाण्याच्य
ा गुणवत्तेची मानके,भारतातील
नद्दयांची आंतजोडणी करणे,पावसाचे पाणी साठवून
ठेवण्याच्या पारंपारिक व अपारंपारिक पध्दती,भूजल व्यवस्थापन
-तांत्रिक व सामाजिक बाबी,कृत्रिम भूजल
पुनर्भरणाच्या पध्दती,संकल्पना व पाणलोट क्षेत्राचे
व्यवस्थापन,कोरडवाहू जमिनीवरील शेती व त्यातील समस्या,पीक
उत्पादनासंबंधात पाणी वापराची क्षमता,जल सिंचनाचे
पाणी वाहून जाण्याचे प्रमाण
कमी करण्याच्या उपाययोजना,ठिबक व तुषार जलसिंचन,पाणथळ
मृदेचे जलनिस्सारण,कारखान्यातील दूषित पाण्याचा जमीन व
पाणी यावर होणारा परिणाम.

• सामान्यस अध्ययन - दोन- भारतीय संविधान व भारतीय
राजकारण

सामान्य अध्यन - दोन
भारतीय संविधान व भारतीय राजकारण
(महाराष्ट्रच्या विशेष संदर्भासह)व कायदा

दर्जा:पदवीएकूण गुण:१५०

प्रश्नपत्रिकेचे स्वरूप:वस्तुनिष्ठकालावधी:२ तास

टीप:
(१)प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे स्वरूप
आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की,एखादी सुशिक्षित
व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तरे देऊ शकेल
आणि विविध विषयातील उमेदवाराच्या सामान्य
ज्ञानाची चाचणी हा त्याचाउद्देंश आहे.
(२)उमेदवारांनी खाली नमूद केलेल्या विषयातील / उपविषयातील
अद्दयावत आणि चालू घडामोंडीचा अभ्यास करणे अपेक्षित आहे.
------------------------------------

१. भारताचे संविधान:संविधानाची निर्मिती प्रक्रिया,संविध
ानाची ठळक वैशिष्टये,उद्देशिकेतील तत्वज्ञान(धर्मन
िरपेक्ष,लोकशाही आणि समाजवादी),मूलभूत अधिकार व
कर्तव्ये,राज्य धोरणाची निर्देशक तत्वे,मोफत आणि सक्तीचे
प्राथमिक शिक्षण,सामाजिक नागरी संहिता आणिमूलभूत
कर्तव्ये,केंद्र राज्य संबंध आणि नवीन राज्यांची निर्मिती,स्वतंत
्र न्याय व्यवस्था सुधारणंची प्रक्रिया आणि संविधानातील
प्रमुख सुधारणा:संविधानाचा अर्थ लावताना वापरण्यात आलेले
ऐतिहासिक न्यायनिर्णय,प्रमुख आयोग
आणि मंडळांची रचना आणि कार्येः निवडणुक आयोग,संघराज्य
आणि राज्य लोकसेवा आयोग,राष्ट्रीय
महिला आयोग,मानवी हक्क आयोग,राष्ट्रीय अल्पसंख्यांक
अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती आयोग - नदी पाणी विवाद
निवारण मंडळ इ.

२. राजकीय यंत्रणा(शासनाची रचना,अधिकार व कार्ये) :भारतीय
संघराज्याचे स्वरूप - संघराज्य व राज्य - विधिमंडळ,कार्यक
ारी मंडळ व न्याययंत्रणा,केंद्र - राज्य संबंध -प्रशासकीय,कार्
यकारी व वित्तीय संबंध,वैधानिक अधिकार,विषयांचे वाटप
(१)केंद्र सरकार:केंद्रिय कार्यकारी मंडळ:राष्ट्रपती
,उपराष्ट्रपती,पंतप्रधानव मंत्रिमंडळ - भारताचा महाअधिवक्ता -
भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक
(२)केंद्रीय विधीमंडळ:संसद,सभापती व उपसभापती,संसदीय
समित्या,कार्यकारी मंडळावरील संसदेचे नियंत्रण
(३)न्यायमंडळ:न्यायमंडळाची रचना,एकात्मीक न्यायमंडळ -
कार्ये,सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाची भूमिका व
अधिकार,दुय्यम न्यायालये - लोकपाल लाकायुक्त आणि लोक
न्यायालय सांविधानिक आदेशाचे रक्षण करणारे न्यायमंडळ,न्याय
ालयातीलसक्रियता.जनहित याचिका.

३. राज्य सरकार व प्रशासन(महाराष्ट्रचा विशेष संदर्भासह)
:महाराष्ट्र राज्याची निर्मिती आणि पुर्नरचना,राज्य
पाल,मुख्यमंत्री,मंत्रिमंडळ,मुख्य सचिव,राज्य
सचिवालय,संचालनालये,विधानसभा,विधानपरिषद -
अधिकार,कार्ये व भूमिका - विधिमंडळ समित्या,मुंबईचा नगरपाल
(शेरीफ).

४. जिल्हा प्रशासन:जिल्हाप
्रशसनाचा विकास,जिल्हा दंडाधिकाऱ्याची बदलती भूमिकाः कायदा
सुव्यवस्था,कार्यकारी विभांगांबरोबरचे संबंध - जिल्हा प्रशासन
व पंचायतराज्य संस्था,उपविभागीय
अधिकाऱ्याची भूमिका आणि कार्ये.

५. ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन:७३ व्या व ७४
व्या घटना दुरूस्तीचे महत्व,स्थानिक प्रशासनाचे सबलीकरण व
विकासातील त्यांची भूमिका.
(१)ग्रामीण स्थानिक शासन:जिल्हा परिषद,पंचायत
समिती आणि ग्राम पंचायतीची रचना,अधिेकार व कार्य,महाराष्ट्
रातील पंचायत राज संस्थेची खास वैशिष्टये पंचायतराज
संस्थांच्या स्थितीचा अहवाल व त्यांच्या कामगिरीचे मूल्यन,७३
व्या घटनादुरूस्तीची महत्वाची वैशिष्टये,अंमलबजावणीतील
अडचणी,प्रमुख ग्रामीण विकास कार्यक्रम आणि त्यांचे
व्यवस्थापन.
(२)नागरी स्थानिक शासन:महानगरपालिका,नगरपरिषद
आणि कटक मंडळाची रचना व कार्ये,रचना अधिकारी,साधन
संपत्ती,अधिकार - कार्ये आणि नियंत्रण,७४
व्या घटनादुरूस्तीची महत्वाची वैशिष्टयेः अंमलबजावणीतील
समस्या,प्रमुख नागरी विकास कार्यक्रम व त्यांची व्यवस्थापन.

६. शिक्षण पध्दती:राज्य धोरण व शिक्षण
याविषयीची निर्देशक तत्वे,वंचित घटक - अनुसूचित
जाती,अनुसूचित जमाती,मुस्लिम व महिला यांचे शिक्षणविषयक
प्रश्न,शिक्षणाचे खाजगीकरण - शिक्षणाच्या प्रांतात
प्रवेश,गुणवत्ता,दर्जा वसामाजिक न्याय यासंबंधीचे मुद्दे;उच्च
शिक्षणातील आजची आव्हाने,सर्व शिक्षा अभियान,माध्यमिक
शिक्षा अभियान.

७. पक्ष आणि दबाव गट:पक्ष पध्दतीचे स्वरूप - राष्ट्रीय
पक्षांची भूमिका - विचारप्रणाली,संघटन व निवडणुकीतील
कामगिरी - राजकीय पक्ष व त्यांचे सामाजिक अधिष्ठान,प्रादे
शिकतावाद - प्रादेशिक पक्षांचा उदय - विचारप्रणाली,संघटन व
निवडणुकीतील कामगिरी,महाराष्ट्रतील प्रमुख दबाव गट व
हितसंबंधित गट - त्यांची भूमिका व धोरण निर्धारणावर
त्यांचा होणारा परिणाम;महाराष्ट्रातील समाज कल्याण
कार्यक्रम,महिला व बालक,कामगार व युवक,अशासकीय संघटन व
समाज कल्याणामधील त्यांची भूमिका.

८. प्रसार माध्यमे:मुद्रणव इलेकट्रॉनिक प्रसार माध्यमे - धोरण
निर्धारावर त्यांचा होणारा परिणाम,जनमत तयार करणे व
लोकजागृती करणे,भारतीय वृत्तपत्र परिषद(प्रेस काऊन्सिल ऑफ
इंडिया) ;भारतासारख्या धर्मनिरपेक्ष लोकशाहीमधील जनसंपर्क
प्रसारमाध्यमांसाठी आचारसंहिता,मुख्य प्रवाहातील जनसंपर्क
प्रसारमाध्यमांमधील महिलांचा सभाग:वस्तुस्थिती व
मानके,भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्यावरील
प्रसारमाध्यमांमधील महिलांचा सहभागः वस्तुस्थिती व
मानके;भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्यावरील मर्यादा.

९. निवडणूक प्रक्रिया:निवडणूक प्रक्रियेची ठळक वैशिष्टये -
एक सदस्यीय प्रादेशिक मतदारसंघ,दुर्बल घटकांकरिता राखीव
मतदारसंघ,प्रौढ मताधिकार - निवडणूक आयोगाची भूमिका -
सार्वत्रिक निवडणुका - प्रमुख कल - मतदान वर्तनाचे स्वरूप
आणि मतदान वर्तनावर प्रभाव पाडणारे घटक - खुल्या व
निःपक्ष वातावरणात निवडणुका घेण्यामधील समस्या व
अडचणी - निवडणूकविषयक सुधारणा - इलेक्ट्रॉनिक मतदान
यंत्रे.

१०. प्रशासनिक कायदा:कायदयाचे राज्य,प्रशासकीय
स्वेच्छानिर्णय आणि त्याचे नियंत्रण व न्यायिक
आढावा.प्रशासनिक न्यायाधिकरणे,त्यांची स्थापना व
कार्यशीलता,नैसर्गिक न्यायाची तत्वे.

११. केंद्रसरकारचे व राज्य शासनाचे विशेषधिकार:भारतीय
साक्षीपुरावा अधिनियमाचे कलम १२३,शासकीय गुपिते
अधिनियम,माहितीचा अधिकार आणि शासकीय गुपिते.

Tags: mpsc syllabus , mpsc katta , mpsc exam , mpsc information, mpsc que , mpsc gk

Share this article :